STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Fantasy Inspirational Others

3  

manisha sunilrao deshmukh

Fantasy Inspirational Others

वेदना

वेदना

1 min
195

खूप झाले करून त्याचे कष्ट

तरीही मिळेना त्याला 

विसाव्याचे काही क्षण

जिवही आता थकला त्याचा


 शेवटच्या क्षणाला वाटे

 आता तरी थोडा निवांत हवा

 कष्टाने जिव वैतागला रे त्याचा

 बघ ना त्याच्या कडे आता तरी देवा

 नको करू त्याचा हेवा 


आता दिवस आलेत जवळ निरोपाचे

वाटे यावे दिवस चार तरी सुखाचे

 नातू, पणतू झाले गोतावळा वाढता

 श्रमही झाले खूप आराम हवा आता


किती बघशी अंत देवा सोडव रे त्याला

सोसवेना वेदना आता माझ्या बापाला

 स्वतःचा जीव ही त्याला जड झाला

 बघ ना रे देवा आता तरी

 बाप माझा तुझ्या पायथ्याशी आला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy