STORYMIRROR

Nishigandha Upasani

Abstract Fantasy Inspirational

4  

Nishigandha Upasani

Abstract Fantasy Inspirational

मी परी जादुभरी

मी परी जादुभरी

1 min
529

परी असे मी जादुभरी,

स्वप्न माझे करे खरी.

साऱ्यांची असे मी प्यारी,

उंच घेईन गगनभरारी.


लावण्याची ही अदाकारी,

सौंदर्याची मीच नारी.

हेवा करती माझा सारी,

शालीन मी नी संस्कारी.


सदा असते मी हसरी,

मुखी माझ्या वाजे बासरी.

जीव लाविते मी सासरी,

माहेरची मी गोंडस परी.


आनंदाची उधळण करी,

विज्ञानाची कास धरी.

वर्षाव करते सुखसरी,

हर्षाने ओंजळच भरी.


विसरवते दुःखच सारी,

जिद्दीची देई ललकारी.

सुख आणते मी दारी,

जगात असे मीच न्यारी.


फिरवते मी जादूची काडी,

लावते माझी सर्वांस गोडी.

दुःखांना मागे सहज सोडी,

हलकेच विहरते ही होडी.


माझ्या अंगी ममता माया,

अन त्यास वात्सल्य छाया.

झिजवते सर्वांसाठी काया,

कौतुक करती आयाबाया.


सुखाची मी जणू नांदी.

तुटलेले नातेही सांधी.

कुटुंबाची आकांक्षा पुरी,

करणारी मी खरी परी.


दिव्यातली जणू वात मी,

तिमिराचा नायनाट करी.

अशी स्वप्नवत खरीखुरी,

परी असे मी जादुभरी.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract