वैरी भयावह रात्र (भवानी वृत्त)
वैरी भयावह रात्र (भवानी वृत्त)
ऐकत अशी किंकाळी, संध्याकाळी, झाले बावरी
हुरहूर दाटली मनी, कंप या तनी, झाले कावरी.....
चालला खेळ सावली, दिसे बाहुली, कुट्ट अंधारी
खेळ चालू तो रात्री, सुन्न मी गात्री, भयभीत वारी.....
येई पाऊली नाद, भयानक साद, ती ही घालते
पाहुनीया ते चित्र, कुणी ना मित्र, मन माझे भिते.....
विदारक अशी ही स्थिती, मंद ती मती, वाटे एकटे
भयंकर असले सारे, भयाण वारे, करुनी ते रिते.....
पारखे नाते ते ही, अलिप्त मी ही, एकटेपण ते
रात्र असली ही वैरी, काळ जणू अरि, हृदय द्रवते....
असली कठीण परिस्थिती, लुप्तली गती, हरपले भान
हरली तहान अन भूक, परी मी मूक, घाले थैमान......

