STORYMIRROR

Prashant Kadam

Horror

4  

Prashant Kadam

Horror

मुंबईकरांस फरक तो काय पडणार !

मुंबईकरांस फरक तो काय पडणार !

1 min
28.1K


मुंबईकरांस फरक तो काय पडणार


मुंबईकरांस फरक तो काय पडणार ?

जरी कीतीही वाढवल्या लोकल ट्रेन


किंवा आणल्या नवीन सुंदर मेट्रो ट्रेन

अथवा आली जरी अतीजलद बुलेट ट्रेन


मुंबईकरांची दैना संपवणार कोण ?

परप्रांतीयांचा लोंढा थांबवणार कोण ?


पाहीला आपण एलफिन्स्टन चा हादसा

जीन्यात घुसमटुन मुंबईकरांचा फडशा


घुसमटुन बावीस जणांनी प्राण गमावला

पावसानेही वेगळाच हाहाःकार माजवला


मुंबापुरी तर आहे ही सर्वांची लाडकी

म्हणूनच तर इथे होते नेहमीचीच गर्दी


लाखो लोक रोज मुंबई दर्शनास येतात

मात्र त्यातले अनेक कायमचे राहतात


निर्बंध नाहीत त्यांच्या अशा येण्यावर

मग ताण पडतोय आपल्या या मुंबईवर


उपाय नाहीत अजुन नागरी समस्यांवर

जुन्या अपुऱ्या पायाभूत कार्मीक सुविधांवर


अशा हादशांची मग पनरावृतीच होणारं

अन निरपराध मुंबईकर असाच मरणार


दोन दिवस पुन्हा मुंबईकर हळहळतील

मृतात्यांस श्रद्धांजली अर्पुन व्यस्त होतील


आता तरी नवीन नियम येतील काय ?

प्रशासन प्रवेश निर्बंध आणेल काय ?


मुबईकरांची ससेहोलपट थांबेल काय ?

देशांत सर्वत्र समान विकास होईल काय ?


परप्रांतीय स्वःताच येण थांबवतील काय ?

आपापल्याच राज्यांत कामे करतील काय ?


सरकार मुंबईवर लक्ष केंद्रित करेल काय ?

मुंबईकरांच्या हाल अपेष्टा थांबवेल काय ?


पायाभूत नागरी सुविधा नव्याने होतील काय ?

सरकार मुंबईची शान जगात वाढवेल काय ?


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Horror