STORYMIRROR

Sayli Kamble

Horror

3  

Sayli Kamble

Horror

अंधारलेली रात्र

अंधारलेली रात्र

1 min
482

बऱ्याच दिवसांनी सुट्टीला गावाकडे गेलो

मी आणि मित्र नेहमीच्या कट्टयावर भेटलो


गप्पांमध्ये किती गेला वेळ कळालेच नाही

अजूनही गावाकडे विजेची सोयच नाही


हळू हळू मग अंधार पडायला सुरूवात झाली

अमावस्येच्या दाट काळोखात वाट दिसेनाशी झाली


माझ्याकडे बाईक असल्याने तशी काही चिंता नव्हती

पण अति आत्मविश्वासामध्ये आमची वाट चुकली होती


छोटी वाट असल्याने बाईक तिथेच सोडावी लागली

दोघांनी निमुुटपणे पायवाट धरावी लागली


दोघेही शूर असल्याचा आव आणत होतो

पण खरे तर आतून पूरते घाबरलो होतो


मध्येच येत होता पायाखाली येणाऱ्या पाचोळ्याचा आवाज

थंड वातावरण असूनही दारून फुटला घाम आज


एक कुंपण दिसले, वाटले काही आडोसा मिळेल

पण स्मशाण निघाले ते, तोंडून आवाज काय निघेल


दूरून एक पूसटशीआकृती दिसू लागली

ती जवळ येताना दिसताच मित्राची बोबडीच वळाली


दुसऱ्याच क्षणी माझी ही शुध्द हरपली

थेट मग दोघांना सकाळीच जाग आली


विचार करत होतो, काल जे घडले ते स्वप्न तर नव्हते

पण त्या प्रकाशमान आकृतीला विसरणे शक्यच नव्हते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror