भय
भय
अंधाराच्या वाटेत
भेटला एक कुत्रा रस्यावर
घाबरून गेलो मी
चढून बसलो झाडावर ।१।
वाटे मजला ते भूत
अंधारात चमके डोळे
भासे मजला टाकती तो
माझ्यावर आगीचे गोळे । २।
झाडावर बसला होता
वेटोळे घालून साप
पाहताच त्याला मी
म्हटलं बाप रे बाप ।३।
फुटताच काचेची बाटली
मायचे डोळे लाल लाल
गालावरती नक्षी काढणार
भीती मला वाटली । ४।
खूप भीती परीक्षेची
दाटून येते मनात
मार्क कमी पडता
ओरडा खायचा घरात ।५।
करू नका आमच्यावर
कोणतीही सक्ती
तेव्हाच मिळेल आम्हाला
भयापासून मुक्ती ।६।
येवू द्या आम्हाला
आनंदाची सुस्ती
करू नका अपेक्षा
आमच्याकडून अति
अभ्यासाच्या ओझ्याखाली
आम्हा दाबू नका
हीच खरोखरी भयमुक्ती ।७।