एक आठवण
एक आठवण
1 min
305
मनी असते बहू साठवण
सांगू कोणती एक आठवण
मनी भरल्या आठवणी काठोकाठ
रात्रभरी गिरट्या घाली एका पाठोपाठ
असते आठवणींची नागमोडी वाट
वाहती डोळ्यांतूनी अश्रुंचे पाट
सुखद आठवणींचा असतो राजेशाही थाट
दुखद आठवणी फोडी आयुष्याचा माट
घालूनी सर्व आठवणींचा नीट मेळ
असाच खेळावा आयुष्याचा खेळ
