परी
परी

1 min

267
आकाशात उडत आहे कोणीतरी
म्हणे तिचे नाव आहे परी
इवले इवले डोळे दिसतात किती लहान
जादूची कांडी फिरवून जादू करते छान
तिच्यासवे उंच विहरावे गगनात
असे वाटे मला स्वप्नात
क्षणात येथे क्षणात तेथे उडे जगभर
जादुच्या कांडीने माझा अभ्यास तरी कर
तुझ्यासवे मलाही फिरण्या आवडे
नेशील का मजला तुझ्या घराकडे ?
पाहूनी तुझे सुंदर रूप
तू आवडी मजला खूप