ध्येय
ध्येय
अनंत आमुची ध्येयासक्ती
अनंत आमुच्या आशा
झोकून द्या स्वतःला
पहा सुंदर यशाची नशा
ध्येयासाठी संघर्षांचे वादळ
पण लाभती प्रेरणेचे हात
यशाची चढती शिखरे
दिसतो कौतुकाचा थाट
थांबला तो संपला
आत्मविश्वासाची पेटवा पणती
सातत्याची वळावी वात
यशाची मिळती पोचपावती
