Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Megha Daware

Inspirational Others

4.3  

Megha Daware

Inspirational Others

स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

2 mins
341


भारताच स्वातंत्र्य फुकट मिळाल नाही 

लढल्या त्यासाठी आपल्या बहिणी अन आई

रक्ताचं पाणी करून झटल्या स्वातंत्र्याच्या माई 

आम्ही आज जिवंत कारण त्यांचीच पुण्याई


होत्या थोर पंडिता रमाबाई

जन्म कर्नाटक पण होती महाराष्ट्राची आई

'हंटर कमिशनपुढे' दिली शिक्षणाची ग्वाही

हट्ट करून स्त्री शिक्षणाचा, बनली आमची ती माई


होत्या थोर सवित्रीबाई

'स्त्री मुक्ती' आंदोलनात अग्रनी ती ताई 

स्त्री उद्धरासाठी चालली तिची शाई

'पहीली शिक्षिका' बनून ती झाली भारताची आई


होत्या थोर रानडे रमाबाई

'सेवासदन' संस्था उभारी ती ताई

'महिला समाज' उभारला तिने ठाई-ठाई

तिचे स्त्रीमुक्ती कार्य सैदव आमच्या लक्षातच राही 


होत्या थोर निवेदिता ताई

जन्म आयर्लड पण घेतली विवेकानंदांची शिष्याई

'स्त्री शिक्षण' कार्य म्हणजे त्यांचीच पुण्याई

होत्या क्रांतिकारी संघटनेच्या सदस्या त्या आई


होत्या थोर राणी लक्ष्मीबाई

झाशी म्हणजे फक्त त्यांची ओळखच नाही

होती ती त्यांच्या तलवारीची शाई

स्फूर्तीदेवता अशी ग्वाही त्यांना संपूर्ण ब्रह्मांड देई 


होत्या थोर ऍनि बेझंट बाई

मुळ आयरीश पण भक्ती भारतावर वाही

काँग्रेसच्या बनल्या पहिल्या अध्यक्षा त्या आई

'होमरूल लीग' स्थापन करून दिली स्वातंत्र्याची ग्वाही


होत्या थोर मादाम कामा ताई

आयुष्यभर चालली त्यांची विचार अन शाई

'भारताचा पहिला राष्ट्रध्वज' म्हणजे त्यांचीच पुण्याई

अपमान सहन केला पण कधी थांबल्या नाही


होत्या थोर मिस स्लाद ताई

होती इंग्रजच पण घेतली गांधीजीची शिष्याई

'मानवी विकासासाठी' ती पूर्ण जीवनच वाहि

तीच सत्याग्रहिक आयुष्य म्हणजे काही मस्करी नाही


होत्या थोर सरला चौधराणी ताई

'भारत स्त्री महामंडळ' म्हणजे तिची पुण्याई

स्त्रियांच्या प्राथमिक शिक्षणाशिवाय ती थांबलीच नाही 

होती दयाळू अशी स्वाभिमानी ती आई


होत्या थोर शिंदे ताराबाई

महाराष्ट्राची लेक अन घेतली फुलेंची शिष्याई

'स्त्री-पुरुष तुलना' ग्रंथ लिहून दिली समानतेची ग्वाही

तलवारीप्रमाणे विचार अन शब्द बनले शाई


होत्या थोर त्या राणी अब्बका ताई 

चौटा राजवंशच्या राणी अन कार्य सेवेतच वाहि

स्वतः उतरली मैदानात पोर्तुगीजाशी युद्ध कराई

विरमरण काय असत त्याच उदाहरणं म्हणजे ही आई


होत्या थोर मातंगिनी हाजरा बाई

'गांधी बुढी' म्हणून ज्यांची ओळख होती ठाई-ठाई

स्वातंत्र्यासाठी लढल्या मृत्यू जोपर्यंत येत नाही

करबंदी आंदोलनापासून त्यांचे कार्य नेहमी स्मरणात राही


होत्या थोर जनक्काबाई

निराश्रित सेवासदनातुन मिळाली ओळख ठाईठाई

'देवदासी प्रथेविरुद्ध' दिली धडाकेबाज ग्वाही

बहिष्कृत स्त्रियांना सन्मान म्हणजे त्यांचीच पुण्याई


होत्या थोर आनंदीबाई

डॉक्टर बनून दाखवलं शिक्षण म्हणजेच खरी कमाई

अपमान सहन करून म्हटलं 'आता पुन्हा नाही'

एम.डी. पदवी घेऊन दाखवलं ही आहे भारताचीच आई


होत्या थोर जोशी सरस्वतीबाई

'स्त्री विचारवती संस्था' म्हणजे त्यांचीच पुण्याई

त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे जणू दगडावरची शाई 

एकदा लिहिल्यावर पुन्हा मिटणार नाही


होत्या थोर कणकलास बरूआ ताई

'बिरबला' ही त्यांची ओळख अन ग्वाही

पिस्तूलीच्या गोळया झेलत तीच जीवन आम्हाला प्रेरणा देई 

पुरब की आवाज चित्रपटातून जीवन त्यांच स्मरणात राही


होत्या थोर चौधरी जाईबाई

चोखमेळा कन्याशाळा काढून पेरली शिक्षणाची लाही 

'रात्रशाळा' काढून दिली स्त्रीच्या सुरक्षेची ग्वाही 

त्यांच कार्य नेहमी आता आठवणीतच राही


होत्या थोर लक्ष्मी सहगल ताई

त्यांच कार्य शब्दात मांडणे अशक्यच होई

'आझाद हिंद सेनेत' कर्नल पद हे त्यांची पुण्याई

'कॅप्टन लक्ष्मी' म्हणजे त्यांची ओळख ठाई- ठाई


होत्या थोर अरुणा असफ अली आई

गावालीया मैदानातील ध्वज म्हणजे धाडसच होई

एकटी स्त्री असतें वाघीनीची आई 

धाडसी तीच कार्य अन आमचं जीवन धन्याई


होत्या थोर सावरकर यशोदाबाई

'आत्मनिष्ठ युवती समाज' स्थापन केला ठाई-ठाई

टिळकांचे लेख वाचून चालवली आपलीही शाई

बनली 'स्त्री क्रांतिकारक' समाजाचा उद्धार कराई 


ह्या सगळ्या आमच्या माई आता जिवंत नाही

पण अस्तित्व यांच आमच्या रक्तातच वाहि

आम्ही आहो जिवंत कारण त्यांची पुण्याई

त्यांची सदा आठवण आमच्या हृदयातच राही 

खरच अश्या आई पुन्हा मिळायच्या नाही

कारण अशी आई मिळायला लागते पुण्याई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational