STORYMIRROR

Megha Daware

Classics Inspirational Others

4  

Megha Daware

Classics Inspirational Others

प्राधान्य नोकरीला की घराला

प्राधान्य नोकरीला की घराला

2 mins
204

स्त्रियांच प्राधान्य नोकरीला की घरला

हे आयुष्य संपेपर्यंतही समजत नाही स्वतःला

नोकरीला वेळ देऊन कसा वेळ देऊ मी कुटुंबाला

कुटुंबाला वेळ देऊन काय सांगू स्वतःच्या अस्तित्वाला


स्त्रियांच आयुष्य हे काचेसमान असत

हे ऐकत ऐकत माझं आयुष्य मलाच सतवत

कधी कधी माझं मन मला स्वतःच रडवत 

बहुतेक संपत चाललंय आता माझंच अस्तित्व


स्त्रीची बाजू मांडणारी मी फक्त एक कथाकार

मी नाही ढाल अन कुणाची तलवार

मी आहे एक स्त्री अन स्त्रियांच्या ललकार

लिहून काही शब्द फक्त मी देतेय हुंकार


स्त्रियांचे शब्द असतात खरे न्यायचे चौकीदार

दुःख स्वतःच म्हणून सत्याशिवाय काहीच नसणार

पण कदाचित न्याय मिळत असतो वारंवार

तर प्रत्येक स्त्री आज असती एक अमूल्य अलंकार


असं वाटत स्त्रीचा जन्म असतो का खडतर

हक्क मागितला तरी ना मिळतो तो भराभर

आयुष्यात केली स्त्रीने कितीही मरमर

तरीही आयुष्य थांबत पुन्हा शब्दांच्या ओळींवर


स्त्रियांच जीवन म्हणजे न उत्सव न सणवार

काम करत उभीच असतें जणू बनलीय मतदार

राबल्याशिवाय फळ नाही जणू आहे ती कास्तकार

कुटुंबासाठी असतें ही आयुष्यभर कर्जदार


स्त्री खरी असतें स्वतःच्या हक्काची दावेदार

पण विसर पडत जातो तिला या हक्कांचा अलवार

माझे हक्क आहे हे कोणाला बोलणार वारंवार 

आयुष्य संपेपर्यंत बनून जाते ती स्वतःचीच टिकाकार


आयुष्य जगत ती निभावते प्रत्येक किरदार

लेकरांच्या न्यायाच्या बाबतीत ती बनते खरी साक्षीदार

कुटुंबाच्या भविष्यासाठी बनते ती सल्लागार

कारण सृष्टीची ग्वाही तिच कुटुंबाची शिल्पकार


प्रगतीचा मार्ग म्हणजे जगात स्पर्धाचे साठे

भाग घेण्याआधी तिच अस्तित्व स्वतःकडे पाहते 

स्त्रियांची स्पर्धा तिथेच संपून जाते

जेव्हा कुटुंबाची जबाबदारी हुंकार देते 


असं वाटत प्रत्येक स्त्रियांनी नोकरी करायलाच हवी 

अस्तित्व दाखवल्याशिवाय स्वतःचा उद्धार होणार नाही

पण तेव्हा माझं मन मला देते स्वतःचीच ग्वाही

स्वतःच्या कुटुंबाकडे करते दुर्लक्ष कश्यापाई


आयुष्य आहे छोट अन संकट ठाईठाई 

वाटत नोकरीं केली तर कुटुंब देईल आपली ग्वाही 

पण अस्तित्वाशिवाय कदाचित आता जमणारच नाही

स्त्रियांनी नोकरीं केली तर तिच कुटुंबही सुखात राही 


अस्तित्ववाण स्त्री असतें घरच्या रंगमंच्याची कलाकार

निभवते प्रत्येक क्षण ती एक बनून किरदार

नाते बनत सुटत जातात तिच्या आयुष्यात अलवार

पण ती खंबीर उभी असतें बनून आयुष्याची ललकार


यावर एका उपाय आहे थोडा शानदार

नोकरीं करत कुटुंबाला सांभाळावं लागेल अलवार

कुटुंबाशी बोलून बनाव लागेल स्वतःचाच दावेदार

निभावले नवीन रोल आता अजून एक नवाच अवतार 


नोकरी आणि कुटुंब सांभाळून घेईल स्त्री हळुवार 

थोड सांभाळून घेतलं तर सगळं होईल क्रमवार

तिचंच कुटुंब आहे मग समजून घेईल अलवार

जबाबदारी सांभाळून स्त्री काम करेल शानदार


आयुष्य मीही मानते थोड खडतर आहे

पण बॅलनसिन्ग शिवाय ते जमणार नाही

नोकरीं आणि कुटुंब सांभाळता येईल देते मी ग्वाही

थोडे प्रयत्न करा ओठांवर घेऊन शब्द अन शाई

थोडे प्रयत्न करा ओठांवर घेऊन शब्द अन शाई.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics