Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Megha Daware

Abstract Inspirational

4.3  

Megha Daware

Abstract Inspirational

आध्यात्मिक संत महिला

आध्यात्मिक संत महिला

3 mins
294


आपल्या भारताची काही किमयाच न्यारी

अध्यात्मात जगणारी इथे विसरतात दुनिया सारी

मग्न होऊन आपल्या गुरुचेच कैवारी

भक्तांना अनमोल आयुष्याचा उपदेश देतात भारी


अध्यात्मिक जीवनाची काही बातच न्यारी

रहस्य उलगडतात अनोळखी जीवनाचे सारी

आपल्या आश्चर्यचकित अनुभवाच करून प्रचारी

साध्याही वेषात त्या बनतात अनमोल अलंकारी


त्यातही संत महिला म्हणजे रहस्याचे पुजारी

धन्य करतात आपल्याला जन्म घेऊन भूमीवरी

लाभते पुण्याई आपल्याला उपदेशाने अलवारी

खरच अश्या महिला आपल्या आयुष्याच्या खऱ्या अविष्कारी


संत गार्गी वाचकणवी या महिला कथाकारी

रहस्य उलगडत जीवनाचे भेदली दुनिया सारी

आत्म्याच्या शोधाची त्यांची संकल्पना भारी

स्रोते लिहून जीवनावर त्या बनतात साक्षीदारी


ही महिला आत्म्याच्या उन्नतीची खरी दावेदारी

शोधक बुद्धी ठेवत तिने वाचवली दुनिया सारी

उलगडलेल्या रहस्यांची यादी बनवून क्रमवारी

मांडली आपली मांडणी बनून सल्लागारी


संत मैत्रेयी या महिला म्हणजे खऱ्या अवतारी

बौद्धिक महिलांचे प्रतीक बनल्या त्या भूमीवरी

विद्वान आणि सद्गुणी अशी ओळख त्यांची न्यारी

स्त्रीच्या शिक्षणाच महत्व सांगून त्या बनल्या ललकारी


त्यांच्या प्रत्येक कार्याची किमयाच भारी

नवी दिल्लीतील शोध संस्था त्यांच्या नावावरी

शिक्षणाचे मोल जाणणाऱ्या त्या खऱ्या हक्कदारी

बनून एक संत त्यांची शिकवण जगावरी


संत हेमलता या महिला तर खऱ्या अविष्कारी

त्रिपुरा रहस्यांमध्ये तर त्यांचा उल्लेख भारी

सांसारिक पतीला नेले त्यांनी ब्रम्ह मार्गांवरी

शक्ती पाहून त्यांची संपूर्ण शहर ब्रह्म साक्षीदारी


त्यांची महिमा त्यांच्या भक्तांवर एवढी वारी

की शहरातले पोपट सुद्धा ब्रह्म ज्ञानाचे नाव पुकारी

संपूर्ण शहरातले प्राणी बनून भक्त सारी

सांगतात सन्यासाचे महत्व बनून अविष्कारी


संत राणी चुडालाचे जीवन म्हणजे खरे वक्राकारी

सतत घेत अनोळखी वळण ती बनली चमत्कारी

योग वसिष्टात त्यांचा केलाय उल्लेख मात्र भारी

ब्रह्म ज्ञानाची ती बहुमोल्य बनली पालनधारी


पती राजा सिद्धिध्वजची ती खरी कर्जदारी

बनून त्यांची शिक्ष्य त्यांच्यावर पूर्ण जीवन वारी

घेऊन योग्य शिक्षण प्राप्त ब्रम्ह ज्ञान अविष्कारी

योग वसिष्टात त्यांची कथा सांगितलीय लई भारी


संत शारदा देवी यांची कथाही वर्णनकारी

रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी खऱ्या अविष्कारी

कित्येकांनी मानलं गुरु त्यांना या भूमीवरी

देवी अवतार बनून भक्तांचे दुःख दूर केले सारी


अश्या या संत म्हणजे खऱ्या साक्षत्कारी

जगण्याची उम्मेद जागवली बनून सूत्रधारी

अनेकांच्या गुरु बनून बनल्या अलंकारी

आयुष्यात रंग भरणाऱ्या त्या खऱ्या चित्रकारी


संत भैरवी ब्राम्हणी म्हणजे खऱ्या शिक्षण पुजारी

महिला तपस्वी बनून त्या बनल्या पालनधारी

महान रामकृष्ण त्यांना शिक्षक म्हणून स्वीकारी

बनून त्यांचे शिक्षक त्या बनल्या अदभूत अविष्कारी


त्यांचे चमत्कार सांगितल्याने शब्दही होतात भारी

त्या नेहमी तांत्रिक शक्तीची उपासनेवर लक्ष केंद्रित करी

त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रगटिकरण म्हणजे जणू देव कलाकारी

मनशुद्धीचे त्यांचे तंत्र जणू नवा अविष्कार भूमीवरी


संत मीरा यांच्या कथानचे तर कित्येक अलवारी

मीरा बाई अशीच ओळख त्यांची या पूर्ण जगावरी 

कृष्णाची भक्त बनून उधळलेल्या रंगाप्रमाणे प्रेम करणारी

सुरेल आवाजात प्रेमाची भाषा जणू प्रेम अविष्कारी


भक्ती रसात डुबलेली ही संत राजस्थानात जन्मनारी

अलगत प्रेमात पडून ती विसरली दुनिया सारी

नाचत गाजत भक्तीची ती बनली साक्षीदारी

कथन केली भक्ती बनून प्रेमाची दावेदारी


संत अक्का महादेवीचे व्यक्तिमत्व भारी

कन्नड भाषेत त्यांचे ज्ञान आहे उल्लेखनिय सारी

रहस्यमयी कविता वाचून कित्येक संत बनले पुजारी

अक्का म्हणजे मोठी बहीण ही पदवी देतात संत अवतारी


माधुर्य भक्तीवर ती आपले संपूर्ण जीवन वारी

जीवनाला कवितेत उतरवत ती बनली संत इतिहासकारी

तिचा प्रेरणादाई प्रवास जणू अविष्कार भूमीवरी

जीवनाच्या रहस्यात त्यांनी बनवलं आपल्याला चमत्कारी


संत कान्होपात्रा या महिलेची कथा आहे भारी

असली जरी वेश्या तरी नव्हती दुरव्यवहारी

सौंदर्य आणि आकर्षण जणू तिचे गुण कलाकारी

पण धार्मिक जीवन जगण्याची खरी इच्छा बाळगणारी


छळामुळे ती तिच जीवन विठोबाच्या चरणी वारी

तिच्या सौंदर्यामुळे कित्येक लोक छळ करती सारी

विठोबाची बनून भक्त ती बनली साक्षात्कारी

मृत्युंच दारही उघडलं तिने केवळ विठोबाच्या चरणावरी 


संत मुक्ताबाईच्या पायगुणाने पवित्र भूमी सारी

विठ्ठल विठ्ठल नामाने ती अवतरली भूमिवरी

जिवंत करून मृत देहाला दाखवली किमया न्यारी

महाराष्ट्रातिल भक्ती संप्रदायाची ती खरी पालनहारी


अत्याचारी शास्त्रीय रूढीपासून वाचवली दुनिया सारी

बोलून प्रेरणादायी शब्द त्यांचा उपदेश जगावरी

मांडणी केली जीवनाची बनून कलाकारी

भक्ती परंपरेतून त्या बनल्या अनमोल अलंकारी


अशे अनमोल रत्न अवतरले आपल्या भूमीवरी

उपदेश देत न्यायाचा त्या बनल्या साक्षीदारी

जोडून प्रत्येक भक्ताला त्या बनल्या गिरीधारी

जन्म घेऊन भारतात त्यांचा उपदेश जगावरी


वाचून संतांची प्रेरणा आयुष्य बनते दावेदारी

मनात साठवून प्रतिमा जीवन बनते साक्षात्कारी

होऊन त्यांचे भक्त आनंद नाचतो दरबारीं

होऊन तल्लीन त्यांच्या भक्तीरसात जग विसराव वाटत सारी 


पवित्र झाले काही शब्द बनून त्यांचे रत्न भारी 

अघात महिमा त्यांचा जणू आपण कर्जदारी

लिहून काही ओळी शब्द बनतात साक्षीदारी

न्याय मिळतो शब्दांना कारण शब्दांचे ते पालनहारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract