STORYMIRROR

Megha Daware

Inspirational Others

3  

Megha Daware

Inspirational Others

आजची स्त्री कशी असावी.

आजची स्त्री कशी असावी.

2 mins
747

प्रश्न एकच अन् उत्तरे मूल्यवान सुचावी

ती आपल आयुष्य संपूर्ण कुटुंबावर वाही

तिच्या सारखा त्याग करणारा दुसरा कोणी नाही 


आयुष्यात वेळोवेळी वेगळी भूमिका तिने घ्यावी

कुटुंबासाठी जगतांना स्वतःसाठीही जगावी

वेगवेगळ्या प्रश्नांना ती स्वतः उत्तर व्हावी

म्हणून आजची स्त्री उत्तराप्रमाणे सत्य असावी


आयुष्यात प्रत्येक कायाद्याची शिकवण तिने घ्यावी

महिलांबाबत असणाऱ्या कायद्याची उत्तरे शोधावी

योग्य शिकवण घेऊन थोडी तर्कवान असावी

म्हणून आजची स्त्री तर्कप्रमाणे सूचक असावी


स्त्रियांसाठी लढायला ती नेहमी तत्पर असावी

इतरही स्त्रियांसाठी द्यावी तिने अचूक ग्वाही

दिलेल्या हक्कांना तिने समजून घ्यावी

म्हणून आजची स्त्री न्यायिक हक्काप्रमाणे योग्य असावी 


अत्याचारच्या विळाख्यात ती अडकलेली नसावी

कायादयाच्या योग्य आधार घेणारी असावी

तिची हिम्मत पाहून इतरांनाही धाडस भरावी

म्हणून आजची स्त्री स्वतः स्वतःसाठी लढणारी असावी 


स्वतःच्या अस्तित्वासाठी ती नेहमी तयारी असावी

वाईट विचारांशी लढून तिने बाजू आपली मांडावी

भूमिका घेत विविध आपली स्पष्टीकरण द्यावी

म्हणून आजची स्त्री ही विचार उलगडणारी असावी


लढण्याच्या बाबतीत ती अहिंसात्मक असावी

शांततेनेही न्याय मिळतो ही सृष्टीची ग्वाही

चुकीला उत्तर म्हणून फुल न्यायदेवतेला वाही

म्हणून आजची स्त्री ही स्वतःशिही न्यायिक असावी


स्त्री अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेली नसावी

विज्ञान कस काम करत याची स्वतः उत्तरे शोधावी

खरं खोट ठरवणारी स्वतःच स्वतःची न्यायाधीश बनावी

म्हणून आजची स्त्री अंधश्रद्धे विरुद्ध लढणारी विज्ञानवादी असावी 


स्त्री ही पुस्तके वृतपत्रे वाचणारी असावी

जगात काय घडतयं याची जाणीव तिला व्हावी

स्वतः जगाप्रमाणे स्वतःचे विचार तिने मांडावी

म्हणून आजची स्त्री विचारधारी शिक्षित असावी


शिक्षण आहे वाघीनिच दूध ही जगाची ग्वाही

त्यांचप्रमाणे शिक्षित होऊन तिने परिपूर्ण व्हावी

शिक्षनाने कुटुंबाचा उद्धारकर्ता तिच बनावी

म्हणून आजची स्त्री आयुष्य सन्मानाने जगता येईल एवढी शिक्षित असावी 


निर्मळ विचार आणि मन आपला उद्धार वाही

निर्मळ विचारांशिवाय आयुष्याची गोडी कळणार नाही

आपल्याच विचाराने आपल्या कुटुंबाचा उद्धार होई 

म्हणून आजची स्त्री विचाराने निर्मळ असावी 


आपण प्रगती केली तर कुटुंबही सशक्त होई 

स्वतःसाठीच तिने लावून घ्यावी व्यायामाची शाई

ती मजबूत असल्याशिवाय कुटुंब सशक्त होणार नाही

म्हणून आजची स्त्री शारीरिक मजबूत असावी


कर्तव्यापरी शिक्षक दुसरा कोणी नाही

कर्तबगार वृत्तीने तिच्या कुटुंबाचा उद्धारच होई 

कर्तव्य संभाळल्याशिवाय तिची प्रगती होणार नाही 

म्हणून आजची स्त्री कर्तव्यदक्ष असावी


अनुभवासारखा शिक्षक दुसरा कोणी नाही

आणि तो शिक्षक चुकांवरच आपला गुण वाही 

चूका करत तिने स्वतःला अनुभवी बनवावी 

म्हणून आजची स्त्री कुटुंबासाठी अनुभव असावी


कुटुंबातही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा नेहमी व्हावी

आपल मत विचारताच लगेच उत्तरे तिने द्यावी

प्रत्येक मतांच महत्व तिने कुटुंबात रुजवावी 

म्हणून आजची स्त्री आपल्या मतांवर ठाम असावी 


आयुष्यात अलगत स्वतःचीही भूमिका तिने घ्यावी

 फुलांचा निर्मळपणा घेत तिने निरागस व्हावी

सुंदर जीवनाला हळूहळू उलगडत न्यावी

म्हणून आजची स्त्री ही एका हिऱ्याप्रमाणे अनमोल स्त्रीच असावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational