STORYMIRROR

Megha Daware

Inspirational

3  

Megha Daware

Inspirational

आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

2 mins
1.1K

8 मार्च तर आहे एका तारखेचा खेळ 

घरच्या कामापासून स्त्रियांना कधी असतो का वेळ

राब राब राबत त्यांच्या सुखाशी तुटलाय मेळ

त्यांच्या सुखाशी होतेय फक्त चिवडा ना भेळ


त्यातही आपला भारत कर्तृत्ववान भारी

स्त्रियांनी घेतलंय आता पुस्तकं शेजारी

करतेय मेहनत ही आधुनिक नारी

विविध क्षेत्र आता तिचेच आहे सारी


त्यातलीच एक स्त्री म्हणजे 'कविता राऊत'

'धावपटू' बनून पाडला यशाचा पाऊस

'सावरपाडा एक्सप्रेस' ओळख मिळाली धावून

इचा अभिमान म्हणजे आमची शाई अन दाऊत 


बुद्धिमान एक स्त्री म्हणजे 'लता मंगेशकर'

गायक किताब मिळवला तिने या भूमीवर

'भारतरत्न' मिळवून केली स्त्रियांची मान वर

तिचा मंजुळ आवाज जणू पहिल्या पावसाची सर


कर्तृत्ववान एक स्त्री म्हणजे 'इंदिरा गांधी'

पहिल्या महिला पंतप्रधान पण राहणी साधी

देशाच्या प्रगतीमध्ये चालवली बुद्धी

त्यांचे देशहित विचार जणू स्त्रियांची वाणी 


नेतृत्ववान स्त्री म्हणजे 'पाटील प्रतिभाताई'

बनली 'पहिली महिला राष्ट्रपती' जणू भारताची आई

नेतृत्व करून देशाच दिली न्यायाची ग्वाही

इतिहास घडवणारी ती महिला म्हणजे प्रेरणादायी पुण्याई 


दूरदृष्टी असणारी स्त्री म्हणजे 'कल्पना चावला'

अंतराळवीर बनून दाखवली भारताची शक्ती जगाला

स्वप्न पूर्ण करण्याआधी तिची ओळख नव्हती कुणाला 

स्वप्न धाडसाने पूर्ण करणारी ती एक बुद्धिवान महिला


कष्टाळू स्त्री म्हणजे 'बचेंद्री पाल'

तिच कार्य पाहून झाली जनता बेहाल

एव्हरेस्ट सर करून पेटवली आपली मशाल

पहीली महिला बनून दाखवली स्त्री जणू आहे

तलवार अन् ढाल


लोकांच्या नेत्या म्हणजे 'मीरा कुमार'

त्यांचे भाषणातले शब्द जणू तलवारीचे वार

लोकसभा गाजवाली जशी पहीली तलवार

पहिली स्त्री सभापतीची आहे शक्ती अपार


नियमवादी स्त्री म्हणजे 'किरण बेदी'

मिळवली मोठी पदवी पण राहणी साधी

पहिली स्त्री आय.पी.एस बनवून दाखवली बुद्धी

त्यांचे कार्य अधिकारी जणू हिरा अन मोती


आकाशाशी खेळणारी स्त्री म्हणजे 'प्रेमा माथुर'

धाडस दाखवण्याठी ती नेहमीच आतुर

पहिली वैमानिक बनून दाखवलं ती आहे चतुर

त्यामुळे त्यांची कीर्ती पसरली सर्वदूर


कष्टाशी प्रेम करणारी स्त्री म्हणजे 'पी. टी. उषा'

भारताच नाव मोठ करणारी ती तरुनींची आशा

भारताची सुवर्णकन्या अशी ओळख ऑन नकाशा

सातसमुद्रापार जाऊनही मृदू त्यांचीच भाषा


नेमबाजीची ओळख म्हणजे 'अंजली भागवत'

तिच्याशिवाय दुसरी नेमबाज आतानाही आठवत

तिला कष्टाशिवाय दुसरं नाही काही मानवत

तिला पाहून जगतो आम्ही प्रेरणा साठवत


सौंदर्याची स्त्री म्हणजे 'सुश्मिता सेन'

पहिली भारतीय विश्वसुंदरी बनण्याखेरीज नव्हता कुठलाही नेम

बनून यशस्वी मिळवली अभिमानाची फेम

चित्रपटही गाजवाले जणू कष्टाशिवाय नाहीय चैन


न्यायिकपूर्ण लिखाण म्हणजे 'अनुताई वाघ'

लिखाणातून पेटवली स्त्रियांच्या मशालीची आग

'कोसबाडच्या टेकडीवरून' स्पष्ट केली आपली बाब

तिच आत्मवृत म्हणजे स्त्रियांची न्यायिक साथ


दमदार स्त्री म्हणजे 'कर्नामा मल्लेश्वरी'

वेटलिफ्टिंग ची केली तिने पूर्ण तयारी

गाळला घाम तिने भारतीय भूमीवरी 

म्हणून अभिमान गाजतोय तिचा सर्वरी


विद्वान स्त्री म्हणजे 'मेरी कॉम'

लढल्या भारतासाठी या प्रेरणादायी मॉम

कुटुंब सांभाळून दाखवला जगाला आपला फॉम

म्हणून म्हणतो आमचा अभिमान म्हणजेच मेरी कॉम 


न्यायाच्या बाबतीत कठोर 'मीरासाहेब फतिमा बीबी'

न्याय त्यालाच ज्याच पुराव्यासहित सत्यही बाबी 

अश्या स्त्रीयांची असतें अलोकनीय बुद्धी

त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी नंतर अन न्याय आधी


बुद्धिमान स्त्री म्हणजे 'रोहिणी खाडिलकर'

बुद्धिबळाची प्रेरणा अशी ज्याप्रमाणे चातुर्य चर्चर

त्यांनी योग्यता मिळवली या अलोकनीय भूमीवर

त्यांची कार्य पाहून स्तब्द होतात सर्व नारी-नर 


आधुनिक भारतात कर्तृत्ववान स्त्रिया हजार

त्याची प्रेरणादायी कीर्ती आहे सातासमुद्रापार

त्याची शक्ती आणि बुद्धी जणू आहे तलवार

करताहेत नैराश्याच्या विचारांवर वार


स्त्रियांची बुद्धी खरंच बळकट धारी

उच्चं पद गाठतात तेव्हा आम्ही बनतो कैवारी

कोणतही क्षेत्र असो वा दिशा असो चारी

त्यांचा अभिमान जणू आमच्या मनाची तयारी


आजच्या भारतातील या विद्वान स्त्रिया

जननी आपल्या अन आपण त्यांचीच छाया

त्यांनी दिलेली शिकवण नाही जाणार वाया

त्या आपला अभिमान जणू आईची लेकीवर माया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational