STORYMIRROR

Megha Daware

Inspirational Others

3  

Megha Daware

Inspirational Others

स्त्रीजन्माचे स्वागत

स्त्रीजन्माचे स्वागत

2 mins
272

स्त्री-जन्म म्हणजे सुख संपन्न

तिची सेवा पाहून होते लक्ष्मी प्रसन्न

स्त्री-जन्म काही मूर्खता नाही

तिच्या जन्माने कुटुंबाचा उद्धारच होई


स्त्रीभ्रूण हत्ये सारखं पाप दुसरं नाही

लेकीचा खून करणारे पापी नरकातच जाई

तुम्ही काढता स्वतःचा राग पण ती आनंदच वाही

अशी ती गोड बाहुली तुम्हाला पुन्हा मिळणार नाही


अरे लेक असली घरी तर घरचा उद्धारच होई

असतो तिच्यात गोडवा जणू जन्माची पुण्याई

लक्ष्मी आली म्हणतं बोलबाला करता ठाईठाई

सरस्वतीच रूप ती, तुम्हास दानाच पुण्य देई


श्रेष्ठ दान ते कन्यादान अशी ख्याती सर्वर होई

काही क्षणात ती तुम्हाला पुण्य मिळवून देई

तरीही तुम्हाला तिची काही किम्मतच नाही

अरे हृदयातून अश्रू वाहि जेव्हा ती घर सोडून जाई


स्त्री जन्मासारखा दुसरा उत्सव कुठला नाही

देवाने दिली लेक म्हणजे तो उद्धार आपला पाही

लाभते मोठ पुण्य जेव्हा देव स्वतःचा तुकडा आपल्याला देई 

देवाने दिली ती भेट, करता अपमान कश्यापाई 


मांजरीचे दात जशे तिच्या पिल्लास लागत नाही

आईचीही शिकवण लेकीला नवा जन्म देई

प्राण्यातही लेकीची फक्त काळजीच पाही

माणूस म्हणून घेतो पण आपल्यात माणुसकीच नाही 


घर चालवून स्त्री नेहमी जग चालवत राही

तेवढी अतुलनीय क्षमता कोणत्याही सजीवात नाही

तिची बुद्धी असतें तीक्ष्ण ही आहे सृष्टीची ग्वाही

ती देते जीवन पण कोणाला तिची किंमत नाही


स्त्री-भ्रूण हत्या म्हणजे मस्करी नाही

देव सुद्धा फुल आईच्या चरणावरच वाही

त्यांची बोली म्हणजे निसर्गाची शब्द अन शाई 

सृष्टीचा आहे नियम त्या फक्त भागच घेत राही


अरे ती आहे वैभव सपन्न मारता गर्भातच कश्यापाई

शिक्षणाने प्रगती करून ती अभिमान मिळवून देई

स्त्री-जन्म म्हणजेच जणू लाभलेल्या देवाची पुण्याई

तिच्या जन्माने तुम्हाला सुखाचा नवा जन्म होई


स्त्री जन्म म्हणजे आनंद तीचा अपमान करू नका

द्या तीला जन्म मग सुखं स्वतः अनुभवून बघा

घेतील नवा आकार तुमच्या हातावरच्या रेखा

हात जोडून सांगतो तिला एकदा श्वास देऊन बघा

स्त्री जन्माचे स्वागत करून तिला श्वास देऊन बघा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational