Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Megha Daware

Abstract Classics Inspirational

4.3  

Megha Daware

Abstract Classics Inspirational

नारी शक्ती... जिंदाबाद

नारी शक्ती... जिंदाबाद

4 mins
326


आज सांगावी वाटते एकच कहाणी

प्रत्यक्ष एका महिलेच्या जुबानी

घालून डोळ्यात थोड वंगण अन् पाणी

एकवावी महिलेच्या कर्तृत्वाची वाणी


एक विद्वान महिला नाव डोंगरे रमाबाई

जन्म कर्नाटक पण होती महाराष्ट्राची आई

आई वडीलांची लाडकी अन गर्व कसलाही नाही

विद्वत्ता एवढी मोठी की समाजही देई ग्वाही


पण काळ सांगतो उत्तर तेव्हा वेळ प्रश्न विचारत नाही

घडलं असं आयुष्यात समाज मदतीला उभा नाही

तिच्या मनात येई विचार, काय उपयोग बनून शाई

समाज ठेवतो नावे जेव्हा मुलगी एकटी उभी राही


आईवडील सोडून गेले जेव्हा मृत्यू दारात उभा पाही

छोटा भाऊ श्रीनिवासला सांभाळायला ती एकटीच जगात हाई

नव्हता कोणी नातेवाईक जेव्हा दुःख घरच्या उंबरठ्यावर येई

एकटं सांभाळल भावाला बनून त्याची पहिली आई


काही काळ ओलांडताच दुःख वेगात वाढत जाई

पण शिक्षणाची आवड तिला कुठे स्वस्थ बसू देई

शिक्षणासाठी भारतभ्रमनावर निघाली ती भारतमातेची आई

सोबत घेऊन भावला ती यात्रा करतेय ठाई ठाई


धार्मिक शिक्षणाची आवड तिच्यात कुतूहल जागवत राही

कोलकाता मुक्कामी तिला काही विद्वान भेटण्यास येई

तिच्या कणखर विद्वत्तेने सगळे विद्वान थक्क होऊन जाई

जाता जाता तिला 'सरस्वती व पंडिता' पदव्या देण्यात येई


पंडिता रमाबाई नाव घेऊन ती आता जग प्रसिद्ध होई

पण काळाच्या मनात काय चाललंय कोणाला माहिती नाही

सगळं सुखरूप चाललं असतांना तिचा निर्णय आयुष्य बदलून देई

नव्या जुळणाऱ्या नात्यात ती जग बदलवून पाही


शूद्र समाजातील व्यक्तीशी ती लग्न करून घेई 

समाजाने टाकलं वाळीत अन शिव्या दिल्या घाई घाई

पण ती मात्र या निर्णयाला घाबरली मुळीच नाही

सर्व समाज एकच असतो ही तिची अनमोल अशी ग्वाही


सज्जन तिच्या पतिवरच ती पूर्ण आयुष्य वाहि 

पण वर्षानेच तिच्या पतीचा अचानक मृत्यू होई

पतीनिधनानंतर दुःख घेऊन पुण्यात येई रमाबाई

सोबत छोटी लेक अन संसार उघड्यावर ठाई ठाई


पण पुण्यात येऊनही दुःख मात्र साथ सोडत नाही

काही वर्षात लेक मनोरमा इचाही मृत्यू होई

वाटे कधीकधी देव अशीही परीक्षा नक्की घेतो कश्यापाई

हातात काहीच नसतं अन डोळे स्वप्नच शोधत राही


पण ती घाबरून न जाता आयुष्य नव्याने सुरु करून पाही

स्वप्न कुठलंच नव्हतं डोळ्यात पण देशात स्त्रियांना मानही कुठला नाही

प्रयत्न केल्यावरच आयुष्य स्त्रियांच बदलेल थोड काही

म्हणून केली नवी सुरुवात स्त्रियांचा उद्धार करण्यापाई


हंटर कमिशनपुढे साक्ष दिली स्त्री शिक्षणाची देऊन ग्वाही

मिशणाऱ्याच्या संगतीने ती स्त्रियांचा उद्धारच करत राही

ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून स्त्री शिक्षण पसरवलं ठाई ठाई

सन्मान मिळवून देऊन बनली ती प्रत्येक लेकींची आई 


कधीकाळी महिला होत्या लाचार

नव्हता सन्मान अन अत्याचार फार

महिलांबाबत शिक्षण होत बेकार

तेव्हा महिलांनी टाकला वसा मानली हार


वरिष्टांचा राज होता सर्वरी

पुरुषवृत्ती जणू हिऱ्याचीच चोरी

पुरुषांना मान होता चारोचरी

महिलांच्या नशिबी मात्र दुःखच सारी


परकीयांचा काळ होता दावेदारी 

पण परकीयांपेक्षा इथले वरिष्ठच भारी

महिलांच्या बुद्धीला देऊन सामाजिक अंतरी 

महिलांच शिक्षणापासून वंचित ठेवलं सारी 


पण भारतीय स्त्रिया होत्या ललकारी

आगीत जळून प्रकाश देतात सारी

हिच महिलांची बुद्धी अलंकारी

ओळखली सर्व समाजाने चारोचरी


खरच महिलांची बुद्धी असतें ललकारी

कष्ट करताय भविष्यासाठी रात्र दिनवरी

बनून वाईट वृत्तीला त्या टिकाकारी

चांगले विचार पेरताय बनून कास्तकारी


काळ बदलतांना दिसतोय सर्वरी

जणू काही घडलाय एक चमत्कार भारी

महिला आता बनून अविष्कारी

आयुष्य बदलवताय प्रत्येक अंश अनुस्वारी


आजच्या महिला आहे खऱ्या दावेदारी

आपल्या कल्पनेच्या व बुद्धीच्या जोरावरी

बदलवताय दृष्टिकोन बनून कलाकारी

जीवनाला रंगवताय जणू चित्रकारी


वेगवेगळ क्षेत्र गाजवताय बनून अवतारी

करताय स्वतःच रक्षण बनून किल्लेदारी

आयुष्याला वळवताय जणू आहे वक्रकारी

कुटुंबाचही रक्षण करताय स्वतः संपन्यापरी 


महिलांची युक्ती म्हणजे सर्वश्रेष्टच भारी

लावतात कित्येकांना विचार करायला सारी

कित्येक वाईट वृत्तीणी तर समजली मस्करी

आमच अस्तित्व आम्हीच टिकवणार शपथ घेते स्त्रीधारी


मलाही बनाव वाटत आता महिलांचीच हुंकार

सामाजिक एकोप्यासाठी दयावी वाटते ललकार

अस्तित्वासाठी करोनी आपल्या हक्काची पुकार

व्हावी प्रत्येक महिलांची सगळी स्वप्ने साकार


आमच्यासारख्या लेकी गातात त्यांचे पोवाडे हजार

खरतर असतो त्याच्या शब्दात मखमली स्वार

स्पुर्ती मिळते आम्हाला वाचून त्यांच्या कीर्तीचे वार

प्रेरणेने न्हावून वाटते चालवावी आमची तलवार


महिलांच्या प्रत्येक स्वप्नात असते पुकार

आपल्याआधी कुटुंबाची स्वप्ने व्हावीत साकार

त्याच बनून आपल्या कुटुंबाचा आधार

लावतात प्रत्येक इच्छेला कष्ट अपार


जेव्हा नव्हता शिक्षणाचा आधार

तेव्हा प्रत्येक स्त्री होती लाचार

कित्येक काळानंतर करून विचार

आज करतेय ती प्रत्येक क्षेत्रात संचार


आज प्रत्येक स्त्री झालीय स्वतःचीच देवता

कुटुंबाचा उद्धार करित बनतेय ती विश्व निर्माता

अपमान करून तिच्या क्षमतेचा अंत पाहू नका आता

कारण अपमानातही ती तिच्या लेकीला बनवतेय नवी विश्वदाता


काळ बदलायला काही क्षण अपुरे असता

प्रत्येक व्यक्ती स्वतःला वाचवतोय बनून जगजेता

पण ती कुटुंबाला वाचवतीय प्रत्येक क्षण पाहता पाहता

स्वतः जळतेय कुटुंबाला नवा प्रकाश देता देता


पायाची राख करून ती जाळते स्वतःला

नवऱ्याचे सुखासाठी सुख मागते ईश्वराला

स्वतः राब राब राबत आनंद देते कुटुंबाला

संकट येता कुटुंबावर युक्ती वापरून बनते ती ज्वाला


पण वेळ बदलतो तेव्हा तो सांगून बदलत नाही

काळ सुद्धा देतोय महिलांच्या कर्तृत्वाची ग्वाही

शिक्षणाद्वारे हातात घेतलीय तिने कलम अन शाई 

युक्तीची देवता अशी ग्वाही सृष्टीसह ब्रह्माण्डही देई 


पण हा बदल काही सहज झालेला नाही

खावी लागली कित्येक वर्ष तोंडावर शेण अन शाई

स्वतःच्या अपमाणाला समजून स्वतःचीच पुण्याई

अस्तित्व टिकवू पाहतोय प्रत्येक स्त्री ठाई ठाई


स्त्री शिक्षण म्हणजे मस्करी नाही ओ ताई

कित्येक पोरी आताही झटताय शेवटच्या थेंबापाई

अस्तित्व नष्ट म्हणजे चुकीच्या कागदावर लिहलेली शाई

महत्व तिलाच जिचा प्रत्येक क्षण अपमानाच्या उंबरठ्यावर जाई


खरंतर स्त्रीला प्रशंसेची गरज नाही

त्यागातच लपलेली प्रशंसा हिच सृष्टीची ग्वाही

तिच्या अस्तित्वाचा उद्धार मी माझ्या शब्दात पाही 

माझ्या मनात तिच्या सन्मानाशिवाय दुसरं काहीच नाही


महिलांची शक्ती काही साधीसुधी नाही

जी जन्म देते ती रक्षणही करत राही

लेकराच्या उद्धारासाठी ती जीवन पूर्ण वाही

कर्तृत्व देते ग्वाही अन तिचे शब्द बोलत नाही 


स्त्रीच्या शक्तीची आहे एक वेगळीच कहाणी

उदाहरणं देत पराक्रम गाजवते मस्तानी

सहजासहजी ती नाही येत कोणाच्या ध्यानीमनी

पण समजून घेतली तर ती वाटते अमृतावाणी


महिला नसते कुणाच्या पायाची धनी

ती असतें फक्त स्वतःच्या कर्तृत्वाची कहाणी

तीच आयुष्य असत त्यागश्री बनून एक दाणी 

तिची प्रेरणा असतें लेखिकेच्या शब्दांची गाणी


समाजाने जेव्हा तीच हसू उडवलं

असा अपमान तिच्या न मनाला रुचलं

पण एक गोष्ट आता मात्र कळून चुकलं

स्त्री शिक्षण आहे महत्वाचं हे नव्याने सुचलं


स्त्रीच्या कर्तृत्वाची कहाणी सांगणारी

मी तर फक्त एका शुल्लक विचारधारी

करून मी शब्दांशी थोडी शिरजोरी

सांगतेय तेच जे माझं सत्य मतहारी


आज प्रत्येक महिलांच कामच भारी

नाव गाजतंय समाजाच्या दरबारी

बनून प्रत्येक पुरुष साक्षदारी

सांगतेय स्त्रियांच कर्तृत्व सारी


स्त्री असते त्यागाची मूर्तिमंत मूर्ती

थक्क होतात किती तिची पाहून स्फूर्ती

त्याग करतात आयुष्याचा घेऊन शर्ती 

खरच अशी थोर म्हणजे देवाची कीर्ती


कुटुंबाच्या सुखाशी ती बांधते सुखाचा बंध

तिच्या त्यागात कुटुंबही होत मंत्र मुग्ध

होतात कुटुंबाशी तिचे कधी हलकेफुलके द्वन्द 

पण तिच्याशिवाय नसतो कुटुंबात आनंदी आनंद 

तिच्याशिवाय नसतो कुटुंबात आनंदी आनंद.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract