फूल गुरुकुल...
फूल गुरुकुल...
माझे प्रेम
फुलावर
गंध सदा
मनावर... १
बहरते
विचारात
उपकार
हे दानात... २
सुकलेले
मकरंद
आस्वादात
गुलकंद... ३
वेदनांची
आठवण
होता करी
साठवण... ४
संकटात
खुणावते
काटे दुःख
निभावते... ५
भुलण्यास
विनवते
जीवनात
मिसळते... ६
शांत वारे
हसण्याचे
आनंदात
डोलण्याचे... ७
निरंतर
देई ध्यास
समाधानी
जगण्यास... ८
नवा रंग
स्मरण्यास
कळी सुखी
फुलण्यास... ९
आदर्शाचे
एक फूल
सफरीचे
गुरुकुल... १०