STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

शब्दोत्सव...

शब्दोत्सव...

1 min
377


बोल अडखळलेले  

खोल अंतर्मनी रुजती

अपशब्दांच्या खेळात 

गहाण जणू होती !!


पाहता सुख नयनी

प्रकाश मंद दिसती 

वाटा प्रवासातल्या 

कहाणीगत निजती !!


अंधुक तारकांआड 

दृष्टी आगळी देती  

पाऊलखुणा नवनव्या 

हळुवार स्वप्नी येती !!


एकत्रित कुटबासमवेत

आनंदी सहवास नांदती 

संघर्षाच्या काळोखात

जीवन दीपोत्सव सजती !!


क्षण डोळ्यात दिसता

शब्द चांदणे हसती 

शूर मनी समजवता

धुंद रात्र सोबती !!


आनंद या जगण्यातला 

मंगल मनी सदा लपती  

भावभावना क्षणोक्षणी  

आयुष्य सत्कर्मी नेती !!


Rate this content
Log in