माझं जगणं...
माझं जगणं...
मी तुझं आयुष्य काय म्हणून जगावं
माझं जगणं, माझं असल्यासारखं असावं ।।धृ ।।
कुणा नाही रुचलं, कुणा नाही पचलं
मी माझं असणं, माझ्यासाठी निवडलं
हे जशास तसं, माझं जगणं आज असं
उद्याचं कसं काय, मलाही नाही ठावं ।।१।।
तुझ्या बोलण्याची, नाहीच बघ उसनी लाज
मला का असायला हवा, तुझाच रे साज
दिसण्यास माझ्या, तुझं जरी लक्ष्य असलं
तरी मला तमा, माझ्या इच्छेचीच रे ठावं ।।२।।
आवाज माझा, तुझं देणंघेणं नाही त्यास
आलं मनी करून टाकलं, तुझा नाही फास
मनसोक्त खिदळणं, जेव्हा हसावं वाटलं
बिनधास्त अश्रू ढाळणं, जेव्हा रडावं वाटलं ।।३।।
निस्वार्थी मनाचं, काळजीवाहू काळीज माझं
सगळ्यांचा भार वाहत गेलं, निरंतर वे
डंपिसं
कर्तृत्वाचं जरी कधी, माझ्या कौतुक झालं
कुणाच्या डोळ्यात तरी, का नि कसं रे खुपलं ।।४।।
आताशी प्रश्नाचं जळतं निखार, नजरांत करपलं
मग मला, त्याचं उत्तर माझ्याच नजरेत गवसलं
वाहून भार सारा, आज एक स्वतःशीच ठरवलं
जरासं थांबून, मी स्वतःला स्वतःतंच हेरलं ।।५।।
स्वभावाच्या जाळ्यात, कुणाला नाही अडकवलं
माझ्यात स्वतःला शोधा, असंही नाही सांगितलं
जगू द्या मला मुक्तपणे, हसत-खेळत आपलं
श्वास घेऊ द्या स्वैरपणे, असं उणं जगणं नाहीच मागितलं ।।६।।
इच्छांचा घोटण्यास गळा, आमंत्रित नाही केलं
चारित्र्यावरचा डाग दाखवण्यास नाही विचारलं
जाळणाऱ्यांनी जाळलं, हिणवणाऱ्यांनी हिणवलं
माझं आयुष्य कुणासाठी उगाच नाही थांबलं ।।७।।