STORYMIRROR

Mrudula Raje

Fantasy

4  

Mrudula Raje

Fantasy

अमर आत्मा

अमर आत्मा

1 min
344

अमर आत्मा


शरीराच्या पिंज-यातून मुक्त झाले प्राण-पाखरू।

ईश्वराच्या भेटीसाठी धावे, जसे धेनूचे वासरू॥


ओढ लागली ह्या जीवा, केव्हा भेटशी केशवा।

आत्मा झाला मुक्त, त्याला परमेश्वराचा धावा॥


शरीर होते खंगले, मनोव्याधींनी दुभंगले।

कुडीला त्यागुनी आत्म्याचे परमात्म्याशी मिलन झाले॥


एक आस त्या मर्त्य जीवा, राहावे जगी अमर।

जीवनांत झाला तरी, दरवळो कीर्ती-बहर॥


ऐसे सत्कर्म करावे, देवाने निजदूत धाडावे।

प्रवास करताना स्वर्गीचा , शरीरकार्य सफल व्हावे॥


जीवा-शिवाचे मिलन होई, त्याचा उत्कट सोहळा।

आणाया आत्म्याला स्वर्गी, देवाने निजदूत धाडिला॥


स्वर्गाच्या रम्य मंडपी, स्वागताचा समारंभ।

अप्सरांचे नृत्य येथे, देवगणांचा यज्ञारंभ॥


ऐशा मंगल समयी, मुक्ती पावतसे आत्मा।

सोडुनी मर्त्य शरीर, अमर होई तो सुखात्मा॥

       

  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy