Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Shweta Patwardhan

Fantasy


3.2  

Shweta Patwardhan

Fantasy


मुखवटे

मुखवटे

1 min 14.2K 1 min 14.2K

प्लॅस्टिकच्या चेहऱ्यावर महागडा मेकअप,

केसांना इस्त्री आणि डोळ्यांचे लुकअप।।


व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये होतो शब्दांचा खेळ,

फेसबुकच्या पोस्टमध्ये मित्रांचे मेळ।।


फ्रेंड्सलिस्टमधली संख्या दिवसागणिक वाढते,

प्रेमाच्या नात्यांची वजाबाकी होते।।


फोटोज वर पडतो लाईक्सचा पाऊस,

कंमेंट्सही येतात रांगेत उभ्या राहुन।।


फॅन्सी मेसेजेस मधून मिळतात उपदेशाचे डोस,

तरी कुणी तसं वागत नाही हा कुणाचा दोष।।


टॅग आणि अनटॅग होतात टाईमलाईन वर मेन्शन,

त्याने दूर होणार का मनातले डिस्कनेक्शन।।


हॅपी हॅपी चेहऱ्याचे सेल्फी निघतात झटपट,

स्वतःचे हसू बघण्यासाठी कितीतरी धडपड।।


थ्रीजी, फोरजी आणि वायफायचे राऊटर,

टेक्नॉलॉजी झाली अपडेट,

फिलिंग्स मात्र आउट ऑफ ऑर्डर।।


व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत,

मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।।


Rate this content
Log in

More marathi poem from Shweta Patwardhan

Similar marathi poem from Fantasy