बाबा/ वडिल
बाबा/ वडिल
लहानपणी टाकलेल्या पहिल्या पाऊलात वडील दिसतात,
जेवणाच्या प्रत्येक घासात वडीलच तर असतात,
जबाबदारीच्या ओझ्याने खांदे जरी वाकले,
तरी हट्ट आणि लाड पुरवणारे हात नाही थकले..!!
मन समाधानी होते त्यांचे सुखात सर्वांना पाहताना,
डोळे भरून येतात मात्र सासरी लेक जाताना,
संकटसमयी कुटुंबाची ढाल बनून जे उभे राहतात,
अधुरी स्वप्ने ते मुलांच्या डोळ्यातच पाहतात..!!
आयुष्यभर कष्ट करून थकले असतील पप्पा तुमचे हात,
तरी संसारगाडा चालवताना देताय तुम्ही आईला साथ,
स्वतःसोबत साऱ्यांच्याच जीवनाच्या लढाईतला मावळा तुम्ही,
अखंड विश्वाचा भार उचलणारा जणू विठू-सावळा तुम्ही..!!