निर्भीड, स्त्रीशक्ती
निर्भीड, स्त्रीशक्ती
स्त्री शक्तीचा थोर महिमा जगास दावणारी,
कधी भासते स्वतंत्र विचारसरणीची अहिल्या तू,
स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करणारी,
कधी दिसते शिक्षणविषयक प्रबळ विचारांची सावित्री तू,
होऊन रणरागिणी शत्रूस परत धाडणारी,
कधी दिसते अश्वारूढ झालेली राणी लक्ष्मीबाई तू,
लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दावणारी,
स्त्री अस्मितेला पाठबळ दिलेली जिजाऊ तू..!!
फक्त संधी मिळाया अवकाश,
स्पर्शून येतील त्या आकाश,
करुणेच्या सागरासारखे मन तुझे मानी,
युगानुयुगे चालत आलेली स्त्री जन्मा तुझी कहाणी..!!
