मैत्रिण
मैत्रिण
अनोळखी त्या वातावरणात सोबतीन म्हणून आलीस,
आगंतुक येऊन जन्मभराची साथ देऊन गेलीस,
जास्त काळ नव्हतो सोबत आपण,
पण आठवणींच्या गाठोड्यात जपून ठेवले ते सुवर्णक्षण..!!
नात्यानं होती तू माझी फक्त मैत्रीण,
पण कधी दिसायची तुझ्यात आई तर कधी बहीण,
कोणत्याही जोकला फिदीफिदी हसायचो,
मनासारखं नाही झालं की धायमोकलून रडायचो..!!
रोजचा डबा खाऊन बोअर व्ह्यायचे यार,
चल ज्योती मध्ये जाऊ भूक लागली फार,
आठवल्या साऱ्या गोष्टी की एकटीच हसते,
पण शेवटची भेट मात्र डोळ्यात पाणीच आणते..!!
कोणत्याही गोष्टीत आपलं कायम एकमत असायचं,
एकमेकींना काही करायची वेळ
आली की हृदय सुपा एवढं व्हायचं,
हसऱ्या क्षणांना पुरून उरतील
अशा आठवणी देऊन गेलीस,
लाडाची "माऊ" माझी
म्हणून कायम मनात राहिलीस..!!
