निर्विवाद, अथांग, यथाशक्ती
निर्विवाद, अथांग, यथाशक्ती
तिच्यामुळेच मनुष्या जग दुनिया दिसते,
मात्र स्वत्वाशी असते तिचे हळवे नाते,
प्रत्येक घडीला आयुष्य तिचे पुरूष संदर्भ असते,
आत्मसन्मान मिळावा नाहीतर पुन्हा नशिबी चूल-मुल अन जातें..!!
तिच्याच उदरातून तू लेक म्हणून जन्म घेतेस,
नात्यांची परिभाषा शिकवीत कधी बहीण तर कधी मैत्रीण होतेस,
नवदुर्गा होऊन संसारच नाही तर सृष्टी चालवतेस,
तरीही स्त्रीजन्मा सारी दुनिया तुला शापितच ठरविते..!!
