लेक
लेक
1 min
294
मातृत्व साजरं केलं तिने झाले मी जननी,
इवलेसे तिचे पाऊल पडले अंगणी,
दुःख तिचे पाहून काळीज हेलावते,
तिच्या सुखासाठी काहीही करावे वाटते..!!
परीचा फ्रॉक घालून घरभर फिरते,
रुणझुणत्या पैंजनसोबत तुरुतुरु चालते,
लटकेच रुसणे आणि खळखळून हसणे,
निर्भेळ ते सुख आनंद देऊन जाते..!!
रागावून तिच्यावर कधी डोळे मी मोठे करते,
असं का ग आई? शोनपापडी मी तुझी लाडच कर म्हणते,
मी तुला कुठे कुठे सोडून जाणार नाही!
असे म्हणून मला बिलागते,
मधाळ तिच्या बोलण्याने मी रागच विसरून जाते..!!
मायेच्या ओलाव्याने सर्वांचे मन जिंकते,
लहान असो वा मोठे सर्वांना जीव लावते,
'राजकुमारी आहे मी' म्हणून हलकेच लाजते,
होकाराचा दाखला मिळताच आनंदून जाते..!!
