STORYMIRROR

SANKET NARAYAN

Classics Others

4  

SANKET NARAYAN

Classics Others

कलाविष्कार

कलाविष्कार

1 min
7.9K


नाळ जुळता कलाधिपतीसम ...

डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती

अलंकारात प्रतिभेच्या कळ्या उमलती

सुवासिकता साहित्याची भुरळ मनांस घालती ...


नाळ जुळता कलाधिपतीसम ...

अभिव्यक्तीने भूमिका जिवंत ठरती

संवादातून प्रसंग उभे ठाकती

रंगमंचीय दिव्यत्व अंतरात शहारती


नाळ जुळता कलाधिपतीसम ...

गाण्यातून स्वरगंध बहरती

वाद्यातून स्वरमंत्र बरसती

मैफिलीत स्वर्ग आभास घडती


नाळ जुळता कलाधिपतीसम ...

नृत्यातून नवरस विहरती

पैंजणातून हृदय थिरकती

अनुभूतीने पारणे नयनांचे फिटती


नाळ जुळता कलाधिपतीसम ...

रंगातून नक्षत्र दिसती

चित्रांतून लोचन दिपती

कुंचल्यातून प्रतिमा सभोवार बोलती


बाह्यरूपास भाळुनी प्रेमात किती बुडती

वंदन त्या रसिकांस माझे जे ‘कलेवरी’ दाद उधळती !!!


Rate this content
Log in

More marathi poem from SANKET NARAYAN

Similar marathi poem from Classics