STORYMIRROR

Amruta Manohar

Classics

3  

Amruta Manohar

Classics

प्रिय स्वतंत्र भारता

प्रिय स्वतंत्र भारता

2 mins
206

प्रिय स्वतंत्र भारता,

         तुला स्वतंत्र होऊन कित्येक वर्षे उलटली के आत्ता

तुझ्या स्वतंत्र चळवळीत "ति" एक भाग होतीच की... 

पण,सर्वांना स्वतंत्र बहाल करतांना "ति" स्वतंत्रे पासन वंचितच राहीली ,

आजही मग, तुच सांग "ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा ?  

  इथली जाती व्यवस्था निस्तारली म्हणतात आत्ता... 

पण, सामाजिक व्यवस्थेत " ति" सर्वात खालच्या स्तरात होती रे...

याचा सर्वानाच विसर पडलाय जणु... 

मग, आत्ता तिने याचा शोक व्यक्त करायचा

की, तिची स्वतंत्र चळवळ मरकुटीला गेली या तगमग तिने जगायचं...

तूच सांग ना , तुझ्या या पुरूष प्रधान संस्कृतीचीशपथ घेऊन सांग, 

"ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ? 

समानेता हक्क मिळायला रे आत्ता,,,

यातूनच तर ,"ति "सुजाण झाली... 

डॅा., वकील, नोकरदार, अधिकारी, अगदी राष्ट्रपति ही झाली

आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून तूझ्या रक्षणार्थ सज्ज झाली. 

" ति"ने प्रत्येक बाजूने सिध्द केलाय स्वत:ला! 

पण, यातही तिला मोकळा श्वास होता कुठे...

इथल्या विचारीक विवंचनेत जगणाऱ्या सार्यांनी,

"आम्ही सवड दिली, म्हणून तू"! असा ठसा लावून सोडलय रे तिला... 

मग, तुझ्या त्या विवंचीत समाजाचा दाखला देऊन सांग, 

" ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ? 

तुझ्या त्या निर्जीव सिमा रेषांच्या रक्षणार्थ खूप हळवी होतात ना रे सगळे.

त्यासाठी तर, सैनिक बळ, प्रशासन, अत्याधुनिक तंत्रज्ञान सदा सर्वच... 

पण, तिच्या बाबतित एवढे कुणी हळवी नसत बाबा !                                

आणि, अस्सतच तस्स तर, "ति" 

कधी, अशी जन्माच्या आत ति मारली गेली असती का ?                               

 कधी, घरातच संस्कृती च्या नावावर गाडली गेली असती का ? 

मग आत्ता, तुझ्या रक्षणार्थ झडलेल्या प्रत्येक कणांचा उदो-उदो करून सांग

"ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ? 

प्रिय, स्वतंत्र भारता,

    एकदा तरी "ति" च्याकडे डोळसपणे बग जरा... 

कुठे, तुझ्या स्वतंत्र उत्सवाच्या आनंदात तिने तिच्या

अ स्वातंत्र्याचा व्यभिचार अंतर्भूत तर, केला नाही ना... 

अरे... आत्ता तरी प्रिय स्वतंत्र भारता

बोल ना, थोडासा यावरही. 

"ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics