सरी
सरी
पावसाच्या सरी सांडत राहील्या
नित्य
निसर्गाच्या हर एक
घटकासाठी
सरी तळागळापर्यंत झिरपत राहील्या
नवनिर्मितीचा उत्सव व्हावा म्हणून,,,
आभाळ रिक्त होईस्तोवर
थेंबथेंब पाझरतही राहील्या,,,
मौसम होता स्तोवर
सरी, महत्व राखून होत्या
पण, कधी सहज सरींना
वाटल अवेळी रिमझिम बागडाव
स्वतः साठी कधी बरसत राहाव
तेव्हा, मात्र
इतर घटकांची त्राही त्राही झाली
अवकाळीपणाच गालबोट
सरींच्या नावी झाली.
