प्रिय स्वतंत्र भारता
प्रिय स्वतंत्र भारता
प्रिय, स्वतंत्र भारता तुला स्वतंत्र होऊन
कित्येक वर्षे झाली रे आत्ता
तुझ्या स्वतंत्र चळवळीत "ती"ही एक भाग होतीच की.
पण, सर्वांना स्वतंत्र बहाल करतांना
" ती"वंचितच राहीली कुठेतरी मग, तुच सांग
तिने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा. ?
इथली जातीव्यवस्था विस्तारली म्हणतात आत्ता,
त्या जाती व्यवस्थेतील प्रत्येक स्तरातील" ती"
सगळ्यात खालच्या स्तरात होती रे.
याचा सगळयांना विसर पडलाय जणु.. . .
मग, आत्ता तिने याचा शोक व्यक्त करायचा की,
"ती"ची स्वतंत्र चळवळ कधीच मरकुटीला गेली,
या तगमगतेतच तिने जगायच... तुच सांग.......
तुझ्या त्या पुरूष प्रधान संस्कृतीची शपथ घेऊन सांग
"ती" ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा. ?
समानतेचा हक्क मिळालाय रे आत्ता...
म्हणूनच तर, ती शिकली, ती सुजाण झाली,
डॉ., वकील, नोकरदार, अधिकारी, अगदी राष्ट्रपती ही झाली
आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून तुझ्या
रक्षणासाठी सज्ज ही झाली.
तिने प्रत्येक बाजूने सिध्द केलाय स्वतः ला
पण, यातही तिला मोकळा श्वास होता कुठे....
इथल्या विचारीकत विवंचनेत जगणाऱ्या काहींनी
"आम्ही सवड दिली म्हणून तु"
असा ठप्पा लावून सोडले रे तीला आत्ता
अरे, तुझ्या त्या विचारीक विवंचनेत जगणाऱ्या समाजाचा दाखला देऊन सांग....
"ती" ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा. ?
तुझ्या त्या निर्जीव सीमारेषेंच्या रक्षणार्थ
खुप हळवे होतात रे, सगळे त्यासाठी तर
अत्याधुनिक यंत्रणा, सैन्य, प्रशासन सदा सज्जच
पण, "ती" च्या बाबतीत एवढ कुणी हळवे नसत बाबा
आणि अस्सतच तस तर, ती अशी
जन्माच्या आत कुशीतच मारली गेली असती का?
कधी, रस्त्याच्या कडेला निर्वस्त्र पडली असती का?
घरातच संस्कृतीच्या नावावर गाडली गेली असती का?
आत्ता तु, तुझ्या रक्षणार्थ झटलेल्या कणां कणांचा
उदाे उदो करुन सांग, ...
"ती" ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा?
तुझा स्वतंत्र उत्सव बघतेय ती" पिढ्यान् पिढ्या
तिची स्वतंत्र चळवळ मात्र,
प्रतीक्षेतच ऊभी कोपर्यात कुठेतरी. ...
एकदा "ती" च्याकडे डोळस नजरेने बग ना रे...जरा
कुठे तीने, तुझ्या स्वतंत्र उत्सवात, तीच्या
"अ स्वातंत्र्याचा" व्यभिचार अंतर्भूत तर,
करुन घेतलाय नाही ना.....
प्रिय, स्वतंत्र भारता...
बोल ना आत्ता, थोडासा यावरही
"ती" ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा?
