अंतर
अंतर
अंतर चार पावलांचे
गाठु कसे तु सांग सख्ख्या ...
काळ मोठा धुरंदर,
साधला त्याने डाव सख्ख्या...
घुसमट रे ही अदरांना
सांगायला माझी प्रित सख्ख्या...
थांग घे ना तु,
नयनांचे हृदय माझेही, घायाळ सख्ख्या...
नको भेटी आत्ता,
वेगळे आपले ठाव सख्ख्या...
दूरून नजारे घे, घराचे
जवळील कटाक्ष तु ,टाळ सख्ख्या...
वळणवर मी ज्या,
न परतने ,ठाम सख्ख्या...
सावर....तुही मनाला,
मोडला तो भातुकलीचा डाव सख्ख्या...

