STORYMIRROR

Sunjay Dobade

Romance

4  

Sunjay Dobade

Romance

पिंपळपान

पिंपळपान

1 min
17.3K




तू प्रेमाने दिलेलं पिंपळपान

मी दडून ठेवलंय

आठवणींच्या खोल कप्प्यात

मी हळूच धरायचो

ते नाजुक हिरवं पान डोळ्यासमोर

पानाच्या इवल्याशा छायेत

व्हायचीस तू अदृश्य

मी व्हायचो कावरा बावरा

आणि तू खुदकन हसायची

मनाला गुदगुल्या करत


आताही मी कधीतरी धरतो

ते जीर्ण जाळीदार पिंपळपान डोळ्यासमोर

त्याच्या हजारो छिद्रांतून

शोधतो मी तुला

तू कुठेच दिसत नाहीस

मी पुनहा होतो कावरा बावरा

पूर्वीपेक्षाही जास्त

तुझं अवखळ हसणंही

नाही पडत कानी


चालायचंच

ह्या वयात डोळे आणि कानही

साथ देत नाही म्हणे

तरी मी खेळतो तोच

पोरखेळ पुन्हा पुन्हा

तुझ्या आठवणींचं पिंपळपान

जीवंत आहे काळजात तोपर्यंत

खेळत राहीन वेड्यासारखा


तुझ्या आठवणीत रमण्याचा

तोच एक बहाणा आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance