लॅमिनेटेड चेहरे
लॅमिनेटेड चेहरे
1 min
195
चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही हलू न देणारी लॅमिनेटेड चेहऱ्याची माणसे
गरिबांच्या दु:खाने त्यांच्या डोळ्यांत
पाणी येत नाही
कुणाच्या मृत्यूनेही काळजात त्यांच्या
चर्रर्र होत नाही
त्यांच्या हृदयात कधी प्रेम फुलत असेल?
शंकाच आहे!
त्यांच्या हपापलेल्या नजरा
शोधत असतात सावज
त्यांना खुणावतो फक्त
पैशांचा छनछनाट
स्वार्थाने बरबटलेली माणसे
चमडी जाय पर दमडी न जाय म्हणणारी
गरिबांच्या दु:खाने कळवळा येणारी माणसे
वेगळ्या प्रकारची असतात
पण हाय!
चेहराच नसतो त्यांच्याजवळ!!!