STORYMIRROR

Sunjay Dobade

Inspirational

4  

Sunjay Dobade

Inspirational

परीक्षेत नापास होणारी मुले

परीक्षेत नापास होणारी मुले

1 min
406

परीक्षेत नापास होणारी मुले

नसतातच या ग्रहावरची

ती नाही जुमानत तुमच्या भिकार परीक्षा पद्धतीला

त्यांना नाही फरक पडत तुमच्या

दीडकीच्या हिशोबात तोलल्या जाणाऱ्या मार्कांनी

अठ्ठ्याण्णव टक्के मिळूनही

अर्धा टक्का कुठे हरवला याचा शोध घेत

ती नाही गहाण ठेवत आयुष्यभराचा आनंद

जे जीवनाशी एकरूप होत नाही

त्याला नाही म्हणत ती शिक्षण

त्यांना पक्की ग्यारंटी असते

आपण नक्की फेल होणार

बापाचा राग आणि आईचे अश्रू

नाही वळवू शकत त्याचं मन

त्यांच्यापुढे नसतात कुठलीही स्वप्ने

अाणि नसते स्वप्न तुटण्याची भीती

त्यांना माहीत असतात आपल्या मर्यादा

आणि माहीत असतं आपलं सामर्थ्य

ती मुळातच असतात समजदार

आणि कणखरही

म्हणून ती नाही करत आत्महत्या

नापास होण्याच्या भीतीने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational