STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

संस्कार धारा...!

संस्कार धारा...!

2 mins
25K


ताई भाऊबीजेच्या दिवशी

आठवण होता

डोळ्यात पाणी साठते...!


कश्यासाठी सांग मला

मामा भाच्यांचे नाते

असे ग उगाच गोठते...?


मामा मामा असतो

मांडीवरच्या भाच्याला

हे चांगलेच कळते...!


मग का मूल मोठे होता

मामाच्या नात्याला

काळिमा ग उगा का तू फासते....!


सासर चांगले मिळण्यासाठी

जीव भावाचा तुटतो

तुला नाही का तो दिसतो...?


सुखी समाधानी बहिण

पाहुनी प्रत्येक क्षणी

मामाच सुखाने ग नाचतो....!


तुला नाही का कधी

घास तोंडचा दिलेला

सांग नाही का आठवतो....?


छोटीसी नाळ मामा नात्याची

मोठा आधारस्तंभ दुवा

नाही का ग तुझं वाटतो..?


तरीही का सांग बरे

संस्काराची पायमल्ली अशी

तुझ्या हातून का ग होते...?


भावास नसला जरी

गाडी बंगला अन मानमरातब

तरीही तो मानावा चांगला...!


हाच नाही का

पाया संस्काराचा

आई बाबांनी ग घातला....?


विसर पडला का सांग मला

नात्याचा या प्रगतीच्या जंजाळात

कालवा कालव होते ना ग अंतरात...!


मामा मामा असतो

हेच सांगणे असावे कायमचे

नाते जपण्या मायेचे अन

आधाराच्या कृपाछत्राचे मोल कळण्या

आशीर्वादाच्या सक्षम छायेचे


तारेवरची कसरत करीत

मामाच बहिणीच्या सुखासाठी झटतो

तेंव्हा कोठे भाऊबीजेचा

सण आनंदाने घरो घरी आजही घाटतो..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational