छाप...!
छाप...!
सत्तावीस डिसेंबर 2023...!
छाप....!
छाप आपली सुंदर निर्मळ
लीलया कशी तू टाकतो?
प्रश्न मनाचा सांग देवा
असा कसा रे जाणतो...?
उत्तराची माझी अपेक्षा
नकळत पुरती करतो
जाता जाता सांग देवा
हात कसा रे धरतो...?
तूच जाणसी मर्म सारे
अंतरातल्या मम भावाचे
समूळ उच्चाटन करिसी देवा
नित्य हृदयस्थ हेवादाव्याचे....!