STORYMIRROR

Harsha Waghmare

Action

4  

Harsha Waghmare

Action

"जवाबदारी"

"जवाबदारी"

1 min
42.2K


माय बाप गेले सोडून

ओझे खांद्यावर देवून

गरिबी ही नशिबी आली

म्हणून जगणे कां देवू सोडून !!

जन्मास घातले जगात

जगण्यास तोच देईल साथ

तान्हूले आहे सोबत

मेहनतीस दोन हात !!

टिचभर पोट भरण्या

तान्हूले घेऊन कुशीत

भाकरीला शोधाया

जाईन मी रानात !!

शरिरात जोवर त्राण

असे भाकरीही प्राण

नयनी अश्रु घेऊन

ठेवीन कर्तव्याची जाण !!

आई बाबा तुम्ही मजवरी

टाकली जी जवाबदारी

देतो वचन तुम्हास

करीन प्राण पणाने पुरी !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action