STORYMIRROR

Harsha Waghmare

Romance

2  

Harsha Waghmare

Romance

शब्द

शब्द

1 min
2.2K


तू समोर असलीस की

शब्दच सुचत नाही

काय लिहावे काही

कळतच नाही !!


शब्द लिहीता लिहीता

होतो मी नि:शब्द

समोर लिहीलेल्या शब्दांचा

अर्थच कळत नाही !!


तुझा हा शांत

मनमोहक स्वभाव

शब्दांच्या पलीकडले आहे,

लिहीण्याचा,शब्दच सापडत नाही !!


शब्द तेथे अर्थ

नक्कीच असतो

पण,त्या अर्थातून शब्द

शोधावा कैसा,

काहीच कळत नाही !!


शब्दांचे शब्दांतर किती करावे

शब्दांचे अर्थालंकार कसे करावे

शब्दांचे शब्दालंकार काय करावे

त्यासाठी मला शब्दच सापडत नाही

मला शब्दच सापडत नाही !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance