"अस्तित्व"
"अस्तित्व"
1 min
14.8K
अस्तित्व म्हणजे काय?
काही वस्तू नाही
पैशाने किंवा तराजूने
तोलल्या जात नाही !!
काय सांगू पोरा
माझ्या मनीची व्यथा
काय झाली माझ्या
आयुष्याची कथा !!
कसे समजावू मी
माझ्या दु:खी मनाला
मनाची दुर्दशा
दाखवू मी कुणाला !!
आपल्याच घरात
एकटे वाटते मला
गुपचुप राहून घर
धावते रे खायला !!
पैसा कमी होता तरी
चार घास होते सुखाचे
आज मात्र अमाप असूनही
घास फिरतात तोंडचे !!
सुन नातवंडे घरात असून
काहीच उपयोग नाही
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सहन होत नाही !!
माझे अस्तित्व मी
किती जपले होते
पण आता सुनेच्या
वागण्यानं मी मात्र गप्प होते!!
तुझ्या साठी लेकरा मी
सहन केला अपमान
अस्तित्व बनवून मी
जपला मात्र स्वाभिमान !!
आता तूच ठरव पोरा
काय किंमत करायची
माझी आणि माझ्या
असलेल्या अस्तित्वाची !!
अस्तित्वाची !!
