STORYMIRROR

Harsha Waghmare

Others

3  

Harsha Waghmare

Others

" गाभारा "

" गाभारा "

1 min
13.8K


देवा तुझ्या गाभा-यात यायला

किती आनंद वाटायचा

गाभाऱ्यात तुझ्या चरणी

आशिर्वाद मागायचा !!


आज देवा गाभा-यात

भक्तीचा व्यापार चालला आहे

तुझ्या गाभाऱ्यात दलालांचा

चालला बाजार आहे !!


तू विश्व सांभाळतो मग

तुला सुरक्षा हवी कशाला ?

खरचं देवा हा अधिकार

दिला आहेस कां मानवाला !!


तुला वैभवाचा मोह नाही

तरीही उगाच सजवतात

सोन्या चांदीचा तुझ्यावर

भार नुसता लादतात !!


फुलांनी पालखी सजवून

तुझी मिरवणूक काढतात

अन बघ तुझ्याच नावाने

लोक अवतार पण घेतात !!


देवा तू तर फक्त

भक्तीचा भुकेला आहे

पण तुझ्या गाभा-यात मात्र

पुजारी मस्त मजेत आहे !!


देवा मानवाने मानवाला तुझ्या

चरणापासून दूर लोटले आहे

या कलीयुगात देवा

भक्तीचा फक्त बाजार आहे !!


देवा तुझ्या गाभा-यात आम्हाला

फक्त तुझा आशिर्वाद हवा आहे

देवा तुझ्या गाभा-यात आम्हाला

क्षणभर शांती हवी आहे !!

क्षणभर शांती हवी आहे !!


Rate this content
Log in