STORYMIRROR

Harsha Waghmare

Others

3  

Harsha Waghmare

Others

"माय"

"माय"

1 min
26.8K


माय तुले का सांगू

तुह्या साठी माय

शब्दच अपुरे हाय

परतेक शब्दा मंदी तुहाच भास हाय !!१!!


माय सुखाचा सागर तू

पिरतीच मायेर तू हाय

फुलांचा गंध बी तू

पानांची हिरवळ तूच हाय !!२!!


माय मांगल्याचे परतीक

समुंदराची अथांगता तू हाय

धरती, आकाश तू

गौमाता बी तूच हाय !!३!!


चंद्राची शीतलता हाय

पान्याची निर्मलता माय

सुर्याचे किरन पन तूच

अन दामिनी बी तूच हाय !!४!!


कस्तुरीचा गंध तू

अमृताची गोडी माय

दुधावरची साय तूच

पदराची छाया तूच हाय !!५!!


गंगा ,यमुना ,सरस्वती

नद्य्यांईचा संगम सार काई हाय

घरात, झोपडीत,उजाला

तूच,बाप,लेकराची, शोभा हाय !!६!!


ताटा मधली चटनी,रायत,

साखरेचा गोडवा हाय

मिटा वानी खारट बी

तू,नसली तं जेवन जेवन नाय !!७!!


दुर्गा,काली, महालक्ष्मी

सा-या रुपात तूच हाय

या धरतीवर माय

तुह्या बिगर काई मतलब नाय !!८!!


माय रांधनी तूच

ताव्यावरची भाकर तूच

लोकाईची चाकरी करुन

माय आमाले जगवनारी तूच !!९!!


माय कपालाचे मरवट

हातातला हिवरा चूडा

वेनीतला गजरा

तूच,मुखातला पानाचा ईडा !!१०!!


माय जिकड पाहो तिकड

जीवनात तूच तू हाय

तुह्या बिगर जीवन कसं,व

सार अधूर हाय,अधूर हाय !!११!!


Rate this content
Log in