STORYMIRROR

Dinesh Sadashiv

Tragedy Action

4  

Dinesh Sadashiv

Tragedy Action

निर्भया, आसिफा आणि मी

निर्भया, आसिफा आणि मी

1 min
25.7K


काल निर्भया...

      आज आसिफा...

              उद्या ?


रोज होत आहेत आमच्यावर बलात्कार...

आम्ही षंढासारखे उद्या कोण याची वाट पाहतोय.

"वय" आता राहीलेलचं नाहीय फक्त ती "मादी" असावी एवढीच एक माफक इच्छा सध्या तरी

हे कुठे तरी थांबायलाच हवं.

कोण थांबवणार तर " मी "

कारण ,

निर्भया , आसिफातही " अंश" माझाच होता आणि उद्या जी निवडली जाईल तिच्यातही "अंश" माझाच असेल.

कारण , 

प्रत्येक घरात एक " मादी " आहे " वय नसलेली ".

विचार करा , हे फक्त " मी " थांबवू शकतो.

बिंबवून घ्या स्वतःच्या मनावर असे असंख्य " मी " एकत्रित आले तर

उद्याच्या " त्या मादीची " वाट पहावीच लागणार नाही.

आव्हान करतोय तुम्हाला आणि वाट पाहतोय

 * मी * 

तुमची ,तुमची आणि तुमचीही ...

उद्या पुनः निर्भया आसिफाची पुनरावृत्ती न होवू देण्यासाठी.

        

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy