STORYMIRROR

अश्विनी उदगीर

Action

4.0  

अश्विनी उदगीर

Action

बलात्कार

बलात्कार

1 min
24.3K


दुसरीत शिकणा-या माझ्या चिमुकलीने प्रश्न मला विचारला काय?

आई बलात्कार म्हणजे नक्की असतो तरी काय?

असिफा आणि निर्भया सारखा माझ्यावरही होईल काय?

धस्स झालं काळजात आणि लटपटले माझे पाय

बलात्कार म्हणजे काय, तुला काय सांगू बाळा ?

तडफडून तडफडून मरत आहेत एकेक कोवळ्या कळ्या .

वासना म्हणे चाळवते त्यांची, कमी कपडे आणि मेकअपला बघताना

मग आठ वर्षांच्या असिफाने काय साडी नेसायची शाळेला जाताना?

खटला सुरू होतो कोर्टात,पडते तारीख पे तारीख

आरोपीचे वकील लढतायेत केस,कोर्टात शब्दांचा कीस पाडीत

आंधळी न्याय देवता आमची, मुकी आण

ि बहिरी सुध्दा आहे काय?

असिफाच्या किंकाळ्या, निर्भयाच्या हाका तिला ऐकूच येत नाहीत काय?

तुम्ही आम्ही सारेच दांभिक,सज्जनपणाचा बुरखा पांघरतो

मुलगी जाते जिवानिशी, बलात्कारी उजळ माथ्याने वावरतो.

माणुसकीच्या कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवू नकोस आता

बलात्कारी येईल कोणत्याही रूपात,मित्र, शेजारी, आजोबा किंवा काका

तुला वाचवायचे आता शोधलेच पाहिजेत कडक उपाय

नुसता कॅन्डल मार्च काढून,तिचा जीव परत येतो काय?

मुलगी नसते उपभोगाची वस्तू,ठणकावून तुम्हाला सांगितलच पाहिजे

पुरूषातल्या हिंस्त्र जनावराला फासावर आता लटकवलच पाहिजे.


Rate this content
Log in

More marathi poem from अश्विनी उदगीर

Similar marathi poem from Action