STORYMIRROR

Somesh Kulkarni

Inspirational

4  

Somesh Kulkarni

Inspirational

आई

आई

1 min
241

आई म्हणजेच सर्वस्व, करुणेचा सागर असते आई

महती काय वर्णू तिची,शब्दात व्यक्त करता येत नसते आई

गढून जाते कायम कामात, तिला माहितच नसतो विसावा,

गीतेचा कर्मयोग सगळ्या जगात फक्त तिलाच समजलेला असावा;

निरेपक्ष भावनेने काम करताना ती कधीच रुसत नाही,

महती काय वर्णू तिची,शब्दात व्यक्त करता येत नसते आई

अथांग वात्सल्य आणि क्षमाशीलता यांचं एकमेव ठिकाण,

ती असते भावनांचं चालतंबोलतं दुकान;

भरभरून मिळतं सगळं, मात्र नाही मोजावी लागत किंमत काही,

महती काय वर्णू तिची,शब्दात व्यक्त करता येत नसते आई

आपल्या अपयशातही शोधत असते कायम यशाचा अंश,

जाणून घेते चेहऱ्यावरुन आपल्या मनातल्या मजकुराचा सारांश;

आयुष्यभर अपत्याच्या सुखासाठी त्यागिते सारं लवलाही,

महती काय वर्णू तिची,शब्दात व्यक्त करता येत नसते आई

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational