STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Others

4  

Somesh Kulkarni

Tragedy Others

जस्टिस फाॅर

जस्टिस फाॅर

1 min
318

बलात्काऱ्याला व्हायला हवं कठोरातलं कठोर शासन,

कायद्याची अंमलबजावणी महत्वाची, तरच आदरणीय न्यायासन


वेळेत मिळायला हवा अशा पीडितांना न्याय,

वर्षानुवर्षे गुन्हेगारांना रुचकर खाऊ घालून पोसण्याचा उपयोग काय?


जनकल्याणासाठी होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी नाहक बळी जातो मुक्या प्राण्यांचा,

अशा संशोधनात व्हायला हवा वापर या हैवानांचा


हे आहे मान्य की निरपराध्याला नको शिक्षा,

मात्र अपराध्यांनाही ओलांडता येऊ नयेत त्यांच्या मर्यादेच्या कक्षा


काय बदलला काळ कुठून आली ही सामाजिक विकृती?

कशी द्यावी जनसामान्यांनी माताभगिनींच्या सुरक्षेची स्वीकृती?


अशा बाबतीत हवाय एकमताने विरोध, नको वैचारिक तेढ;

स्वराज्य अन् स्वातंत्र्याच्या रणसंग्रामाची हीच का परतफेड?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy