खून
खून
प्रत्येक खुनाला असते पार्श्वभूमी, असतं काहीतरी कारण
कधी असहायता,कधी सूड तर कधी ओढवलेलं मरण
कित्येकदा अज्ञानानं सुरु होतं एखादं कुतूहल संपतं वेगळ्या परिणतीत
करायचं असतं साध्य दुसरंच काहीतरी होतं वेगळं काळ चालत नाही एकाच गतीत
एखाद्या गोष्टीचा होतो त्रास म्हणून का हिरावून घ्यायचा एखाद्याचा जगण्याचा हक्क ?
नातंच तोडून टाकून लांब जायचं म्हणजे नाहीसं होतं दुःख
दरोडेखोरी करण्यासाठी संयम आणि विनय असावा लागत नाही
चांगलं घडवायला सन्मार्गावर असावं लागतं-त्यागावंही लागतं बरंच काही
निरपराध्याला मृत्यूदंड आणि एखाद्याला आत्महत्येला करणं प्रवृत्त हेही खुनाचे प्रकार,
वेळ हेच असतं उत्तर द्यायला विचारांना आकार
कधीही कुठेही कसाही होतो एखाद्याचा खून
सांगता येत नाही कोणत्या स्वरुपात फेडावे लागतात एखाद्याचे ऋण