STORYMIRROR

Somesh Kulkarni

Abstract

4  

Somesh Kulkarni

Abstract

जाणीव

जाणीव

1 min
382

डोळ्यातलं पाणी

मनावरचा घाव

अडकलेले शब्द

ओथंबलेला भाव......... सगळं जाणवतं ! 


विचारांची साखळी

हृदयातली ओल

चिघळती जखम

गेलेला तोल......... सगळं जाणवतं ! 


जाणवलेला बदल

वाटणारी निराशा

संपलेलं नातं

बदललेली भाषा......... सगळं जाणवतं ! 


केलेले कष्ट

खुपणारं यश

भिडणारे शब्द

लागणारा कस......... सगळं जाणवतं !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract