STORYMIRROR

Somesh Kulkarni

Romance Fantasy Others

3  

Somesh Kulkarni

Romance Fantasy Others

प्रियतमा

प्रियतमा

1 min
164

सांजवेळी बैसलेली सोबतीला साजणी,

सूर्य जातो मावळाया येतसे अंधारुनी

हे तुला मी फूल देतो कर अता स्वीकार तू,

तूच केले कैकदा मज प्रेमरंगी ठार तू

वाटते मज प्रियतमे तू अप्सरा तू राधिका,

कचह्रदयीची देवयानी तू शुकाची सारिका

लाजणे तुज शोभते पण नजर तू फिरवू नको,

तोच पाढा मौनतेचा तू पुन्हा गिरवू नको


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance