STORYMIRROR

काव्य रजनी

Romance

3  

काव्य रजनी

Romance

नाते तुझे

नाते तुझे

1 min
11.9K

असे वाटते पुन्हा

आपल्या भूतकाळात जावे

नाते तुझे माझे

नव्याने सुरू करावे


मांडावा डाव तोच 

भातुकलीचा नव्याने

मी तुझ्यात आणि तू 

माझ्यात हरवूनी जावे

नाते तुझे माझे 

नव्याने सुरू करावे


भेटावे तुजला त्याच 

निसर्गाच्या सौंदर्याने

गुजगोष्टी करताना

पुन्हा तुझ्या स्वप्नात

मग विहरावे 

नाते तुझे माझे

नव्याने सुरू करावे


जाणावे भाव तुझे 

नव्या जाणिवेने

अासवे अलगद माझ्या

डोळ्यातील तू पुसावे

नाते तुझे माझे

नव्याने सुरू करावे


विरहाच्या क्षणास त्या

दूर परतुनी लावावे

संगतीत तुझ्याच

हे आयुष्य संपून जावे


नाते तुझे माझे

पंख होऊनी आकाशी विहरले

शोधीत राहिले अस्तित्व 

ढगांच्या सावलीत विसावले


नाते तुझे माझे 

कळी होऊनी वेलिवरी उमलले

शोधीत राहिले विश्व तुझे 

पानांच्या सहवासी सुखावले


नाते तुझे माझे

जल होऊनी झऱ्यातुनी वाहिले

शोधीत राहिले रंग तुझे

समुद्राच्या प्रवासी मन थांबले


नाते तुझे माझे

दव होऊनी गवतावर राहिले

शोधीत राहिले प्रेम तुझे

धुक्यातून मी बावरले.........


असे वाटे मज

काहीतरी व्हावे

नाते तुझे नि माझे

नव्याने सुरू करावे

नव्याने सुरू करावे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance