माझी बाहुली
माझी बाहुली
माझी बाहुली गोड हसते
ती माझ्या काळजात जगते
कोणी तिला गर्भात मारते
अन् जगलीच तर कुणी तिला
जीवंतपणी जाळते
तरी बाहुली माझी गोड हसते
कारण ती माझ्या काळजात जगते
सीता बाजूनं आजही अग्नीपरिक्षा देते,
अन् पावित्र्याच्या संशयात
ती रोजच मरते
तरी बाहुली माझी गोड हसते
कारण ती माझ्या काळजात जगते
कळीसारखी नाजूक ती
निर्भयासारखी खुडली जाते
वासनेच्या या जगात ती
जगण्यासाठी धडपड करते
तरी बाहुली माझी गोड हसते
कारण ती माझ्या मनात जगते
सुशिक्षित झाली पिढी तरी
माणसांची बुद्धी अजून घाण
तिच्या मनातले ना जाणे कुणी
कुणी ना करी तिचा अभिमान
तरी बाहुली माझी गोड हसते
कारण ती माझ्या मनात जगते
कारण ती माझ्या मनात जगते...